मुंबई : माझ्याशी मराठीत बोला असा आग्रह धरल्याने लेखिका शोभा देशपांडे यांना एका सराफाने हीन वागणूक दिली तसंच दोन महिला पोलिसांच्या मदतीने दुकानाबाहेर ढकलून दिलं असा आरोप लेखिका शोभा देशपांडे यांनी केला. एवढंच नाही तर त्या काल दुपारी २ वाजल्यापासून या दुकानाबाहेर ठिय्या आंदोलन करत होत्या.
मनसेने चोप दिल्यानंतर आणि माफी मागत नाही तोवर दुकान उघडू देणार नाही असा इशारा दिल्यानंतर मुंबईतल्या कुलाबा येथील महावीर ज्वेलर्स चालवणाऱ्या सराफाने लेखिका शोभा देशपांडे यांची माफी मागितली आहे.
दुकानदार येऊन जोवर दुकानाचं लायसन्स (परवाना) दाखवत नाही तोवर आपण आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती. दरम्यान आज सकाळी मनसेचे नेते संदीप देशपांडे या ठिकाणी आले आणि त्यांनी लेखिका शोभा देशपांडे यांची भेट घेतली. त्यानंतर दुकानदाराला मनसे स्टाइल दणका दाखवल्यानंतर या मुजोर सराफाने शोभा देशपांडे यांचे पाय धरले आहेत.
काय घडलं नेमकं शोभा देशपांडे यांच्यासोबत
लेखिका शोभा देशपांडे या गुरुवारी दुपारी कुलाबा परिसरातील महावीर ज्वेलर्स या ठिकाणी गेल्या होत्या. दुकानातील व्यक्ती त्यांच्याशी हिंदीतून बोलत होते. त्यांनी मराठीतून बोलावं अशी विनंती शोभा देशपांडे यांनी केली. तसंच दुकानाचा परवाना दाखवा असंही सांगितलं मात्र त्यांनी मराठीत बोलण्यात नकार तर दिलाच शिवाय दागिने देण्यासही नकार दिला. तसंच पोलिसांच्या मदतीने दुकानाबाहेर ढकलून दिलं असा आरोप शोभा देशपांडे यांनी केला. मिळालेल्या या अपमानास्पद वागणुकीनंतर लेखिका शोभा देशपांडे यांनी गुरुवारी दुपारी २ वाजल्यापासून या दुकानाबाहेरच ठिय्या आंदोलन केलं होतं.
Read Also
मराठा आरक्षण : 10 ऑक्टोबरचा ‘महाराष्ट्र बंद’ तूर्तास मागे
https://t.co/X51HAGzqiO#MarathaReservation #MaharashtraBand
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 9, 2020