नवी दिल्ली : दुसऱ्या महायुद्धात जपानच्या एका बाँबने अमेरिका हादरली तसं आमच्या बाँबने मोदी हादरले आहेत, असं सांगणारा अकाली दलाच्या सुखबीरसिंग बादल यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
केंद्र सरकारने शेतकऱ्यांशी संबंधित 3 विधेयकांना लोकसभेत आणि संसदेत मंजुरी दिली आहे. मात्र, या विधेयकांतील तरतुदींना पंजाब व हरियाणातील शेतकऱ्यांनी मोठा विरोध केला आहे. या विधेयकांच्या विरोधात पंजाबमध्ये तीन दिवसांचा बंद पुकारण्यात आला आहे. तसेच, या शेतीविषयक विधेयकांना स्विकार करणार नसल्याचंही येथील शेतकऱ्यांनी म्हटले.
पंजाबमध्ये मुक्तसर इथे एका कार्यक्रमात सुखबीरसिंग बादल यांनी मोदींना कसा धक्का बसला हे भाषणात सांगितलं. ‘दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेच्या अणुबाँबने जसं जपानला हादरवलं, तसा जबरदस्त धक्का आम्ही मोदींना दिला आहे.’ केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी राजीनामा दिल्यानंतर मोदी सरकारला धक्का बसल्याचा उल्लेख त्यांनी केला.
संग्राम जगताप यांची खेळी यशस्वी; मनोज कोतकर स्थायी समितीच्या सभापतीपदी बिनविरोध https://t.co/dmJe69BxQM @sangrambhaiya @GadakhShankarao @prajaktdada @bb_thorat @RVikhePatil
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 25, 2020