मुंबई : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यापासून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्रीमंडळ बैठकीत या मुद्द्यावर चर्चा केली असून महाराष्ट्र राज्य सरकार मराठा आरक्षणाची बाजू न्यायालयात ठामपणे मांडणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.
पण आता या प्रक्रियेला उशीर होत असताना महाराष्ट्रातील मराठा संघटनांनी आंदोलन पुकारण्याची घोषणा केली आहे, त्यामध्ये प्रामुख्याने मराठा क्रांती ठोक मोर्चाने मुंबईतील मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचे नियोजन करत असल्याची माहिती मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत हा मोर्चा मंत्रालयावर धडक देईल अस मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे यांनी म्हटलंय.
यापूर्वी तुळजापुरात आंदोलनासाठी संघटनांनी पुढाकार घेतला होता तेव्हा सरकारला त्यांनी १५ दिवसांची मुदत दिली होती पण त्यावर कुठलीही हालचाल दिसत नसल्यानंर आता हे आंदोलन करणार असल्याची माहिती या संघटनेचे समन्वयक महेश डोंगरे यांनी दिलीय.
पुण्यात आयोजित केलेली मराठा आरक्षण परिषद रद्द करण्यात आली आहे. भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पुढाकाराने मराठा आरक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती. बैठक रद्द करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
Read Also :
सोलापूर येथील बोरामणी विमानतळाच्या भुसंपादनासाठी मिळाली सुधारित प्रशासकीय मान्यता व वित्तीय मान्यता ! शिंदे पिता पुत्रीच्या प्रयत्नांना यश https://t.co/WUZuS65517#PranitiShinde #SushilKumarShinde #Congress @ShindePraniti
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 30, 2020