आमदार रवी राणादेखील त्यांच्यासोबत मुंबईत येणार आहेत. कोरोना झाल्याने नवनीत राणा नागपुरात उपचार घेत होत्या. आता त्या मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार आहेत. श्वास घ्यायला त्रास होत असून नवनीत राणा यांच्या छातीत मोठ्या प्रमाणावर दुखतं असल्याची माहिती मिळत आहेत.
नवनीत राणा यांची तब्येत बिघडल्यामुळे कार्यकर्त्यांची चिंताही वाढली आहे. नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांना अमरावतीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या सहा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु, अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांना नागपूरच्या ओखार्ट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
नवनीत राणा यांच्या सासू-सासऱ्यांवर नागपूरच्या वोकहार्ट रुग्णालयात आधीपासूनच उपचार सुरु आहेत. आमदार रवी राणा यांचे वडील, म्हणजेच नवनीत कौर राणा यांचे सासरे गंगाधर राणा यांचा कोरोना रिपोर्ट 2 ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर कुटुंबातील इतर सदस्य, कार्यकर्ते अशा जवळपास 50 ते 60 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती.