गेल्या काही दिवसांपूर्वी नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांना अमरावतीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर सहा दिवस उपचार सुरु होते. मात्र, त्यांची अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना नागपूरच्या वोक्हार्ट रुग्णालयामधअये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची तब्बेत आणखी बिघडल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी तात्काळ तातडीने मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, नवनीत राणा यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहे. आता त्यांची प्रकृति स्थिर झाल्याने त्यांना आयसीयूमधून सामान्य कक्षात हलविण्यात आले आहे. याबाबत स्वत: नवनीत राणा यांनी फेसबुकवर पोस्ट करुन माहिती दिली आहे. “आज मला आयसीयूमधून सामान्य कक्षात स्थलांतर करण्यात आले आहे, आता माझी प्रकृति थोडी स्थिर आहे असे राणा या व्हिडिओमध्ये म्हंटल्या आहेत.
आपल्या सर्वांचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे, मी लवकर बरी होऊन जनसेवेत पुन्हा सज्ज होणार” असे नवनीत राणा यांनी फेसबुक पोस्ट करताना म्हटले आहे.नवनीत राणा यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.
VIDEO