मुंबई : काल अभिनेत्री कंगना राणावत आणि मुंबई महानगरपालिका यांच्यामध्ये हाय होल्टेज घडामोडी पहायला मिळाल्या. कंगना मुंबईत येण्याआधी पालिकेने सकाळीच कंगनाच्या कार्यालयावर कारवाई करत अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरुवात केली. त्यानंतर कंगनाने हाय कोर्टात धाव घेऊन महापालिकेच्या कारवाईला स्थगिती आणली. त्यानंतर मुंबई महापालिकेच्या कारवाईबाबत अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
आज महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडुन अनेक प्रश्नांची उकल होईल असे मीडियाला वाटत असतानाच महापौरांनी क्वारंटाईन होणार असल्याचे एक ट्विट केले आणि सर्व माध्यमांची निराशा झाली.
किशोरी पेडणेकर यांनी काही वेळापूर्वी ट्वीट करुन आपली कोरोनाची चाचणी पाॅझिटिव्ह आल्याचे सांगितले आहे. आपणाला कोणतीही लक्षणे नसून डाॅक्टरांच्या सल्ल्याने आपण स्वतःच्या घरात क्वारंटाईन होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आपल्या घरातल्यांच कोविड चाचणी करुन घेतली असल्याचेही त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे. आपल्या संपर्कातील सर्व सहकाऱ्यांनी काळजी घ्यावी. आपल्या शुभेच्छा व आशिर्वादाने मी लवकरच मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईन, असे पेडणेकर यांनी म्हटले आहे.
मी कोविड अँटीजन चाचणी करून घेतली ती सकारात्मक आली कोणतंही लक्षणं नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वतः घरी विलगीकरन होत आहे माझ्या संपर्कातील सर्व सहकाऱ्यांनी काळजी घ्यावी
माझ्या घरातील सदस्यांची कोविड चाचणी केली.
आपल्या शुभेच्छा व आशीर्वादाने लवकरच मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईन pic.twitter.com/ayW43cXGrj— Kishori Pednekar (@KishoriPednekar) September 10, 2020
काल कंगना राणावत प्रकरणानंतर विरोधकांनी सरकारला आणि महानगरपालिकेला कारवाईबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर आज महापौर स्वतः या कारवाईबाबत काय बोलणार याकडे मुंबई कारांसोबत समस्त महाराष्ट्राचे लक्ष लागून होते.
Read Also
शिवसेना आता सोनिया – सेना बनली आहे, कंगनाकडून ट्विटर वॉर सुरुचhttps://t.co/DGYwnhDfMC@KanganaTeam @ShivsenaComms
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 10, 2020