महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मित्रपक्षातील नेतेच इतर पक्षात प्रवेश केल्याचे समोर आले होते. शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता आणखी एक काँग्रेस नेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे.
मूळचे भंडारा जिल्ह्याचे प्रशांत पवार हे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. प्रशांत पवार हे काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांचे कट्टर समर्थक मानले जातात. ते ‘जय जवान जय किसान’ संघटनेचे अध्यक्ष आहेत.
प्रशांत पवार यांच्या पक्षप्रवेशामुळे नागपूरच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. ते राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशांत पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील.