मुंबई : दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. असा एकही दिवस नाही की दिवशी एखाद्या लोकप्रतिनिधीला कोरोना झाल्याची बातमी येत नाही.आता अशातच राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आणि सध्याचे भाजप खासदार असलेल्या एका दिग्गज नेत्याला कोरोनाची लागण झाली आहे.
ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच कोरोनाचे 86 हजारहून अधिक लोकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. बॉलिवूडपासून ते राजकारणापर्यंत कोरोनानं अनेकांच्या घरात शिरकाव केला आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. नारायण राणे यांनी स्वत: ट्वीट करून या संदर्भात माहिती दिली.
‘माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्लानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. लवकरच मी लोकसेवेत पुन्हा रुजू होईन’
नारायण राणे यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनीही चाचणी करण्याचं आवाहन नारायण राणे यांनी केलं आहे. सध्या त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन केलं असून त्यांचे डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार सुरू आहेत.
माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्लानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. लवकरच मी लोकसेवेत पुन्हा रुजू होईल.
— Narayan Rane (@MeNarayanRane) October 1, 2020
Read Also
या लढाईतील प्रत्येक मावळा माझ्यासाठी लाखमोलाचा आहे,आत्महत्या करू नका ! छत्रपती संभाजीराजेंचे आवाहन https://t.co/NjNgy8l2nz#ChhatrpatiSambhajiraje #MarathaReservation @YuvrajSambhaji
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 1, 2020