मुंबई : कोकणात यानंतर शिवसेनेचा एकही आमदार निवडून येणार नाही हा राणेंचा फार मोठा विनोद आहे. मी सर्वसामान्य ग्रामपंचायत सदस्यांनाही हलक्यात घेत नाही ,राणेंना तर घेणारच नाही, अशी जोरदार खिल्ली उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी भाजप नेते नारायण राणेंची उडवली आहे. कोकणात शिवसेनेचा एकही आमदार निवडून येणार नाही, असा दावा करणाऱ्या भाजप नेते नारायण राणेंचा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री, शिवसेना नेते उदय सामंत यांनी समाचार घेतलाय.
कोकणात शिवसेनेचा एकही आमदार निवडून येणार नाही हा राणेंचा विनोद आहे. राणेंना सध्या आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असा टोला उदय सामंत यांनी लगावला. आम्ही सर्व तीन-चारदा निवडून आलेलो शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आहोत.
आम्ही पराभव कधीच पाहिला नाही. राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक घ्यायचं हे भाजपचं आव्हान आमच्यासाठी फार छोटं आणि कमकुवत आव्हान आहे”, असं म्हणत उदय सामंत यांनी राणेंना ललकारलं.
Read Also :
सत्तेचा माज सोडून मराठा तरूणांच्या भविष्याचा विचार करा अन्यथा मराठा रस्त्यावर उतरला तर इतिहास घडेल…
फटाकेबंदी म्हणजे ‘हिंदू धर्मविरोधी कार्य’, करणी सेनेचा आरोप
अर्णब गोस्वामीचा कारागृहातील मुक्काम वाढला..जाणून घ्या न्यायालयात काय घडलं