मुंबई : चलनी नोटांवर महात्मा गांधी यांच्या दुसऱ्या बाजूला कुणाचा फोटो असायला हवा. यावरून राज्यात एव्हाना देशभरात एकच चर्चा रंगली आहे. लक्ष्मी किंवा गणपतींचा फोटो लावा अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे. तर या चलनी नोटांवर राजकीय नेत्यांचाही फोटो लावा अशी मागणी देखील होत आहे.
“माझी राख झाली तरी चालेल, येत्या 1 नोव्हेंबरला ट्रेलर तर पंधरा दिवसात पिक्चर”; बच्चू कडू आक्रमक
यातच 25 पैशांवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा फोटो लावण्यात आला आहे. आणि त्यावर लिहिलं आहे की, हे फायनल करा. सध्या नारायण राणे यांचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. एकाने तर हे फायनल करा. नाही तर रक्ताचे पाट वाहवू असं देखील म्हटलं आहे. यावर आता भाजप युवा मोर्चाने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
“महाराष्ट्रातील सर्व प्रकल्प गुजरातमध्ये जावेत, ही मोदींचीच इच्छा”
भाजपच्या युवा मोर्चाने या प्रकरणानंतर थेट कुडाळ पोलीस ठाणे गाठत या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. काही व्यक्तींची नावे देखील पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. अशोक स्तंभाच्या जागी राणेंचा फोटो लावून कुणी तरी अशोक स्तंभाचा अवमान केला आहे. हे चुकीचं आहे. तसेच हा प्रकार असंवैधानिक असून खोडसाळपणाचा आहे. त्यामुळे अज्ञात व्यक्तीला पकडून त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील होत आहे.
Read also
- “माझी नाहीतर देशातील 130 कोटी जनतेची मागणी”; केजरीवालांचं मोदींना पत्र
- ती निवडणुक भाजप कदाचित जिंकेलही परंतु…; रोहित पवारांचा भाजपवर निशाणा
- “ठाकरेंनी अडीच वर्षे स्वतःला घरात कोंडून घेतल्यानेच ‘एअरबस टाटा’ गुजरातमध्ये गेला”
- अजितदादा पालकमंत्री होते तेव्हा दर शुक्रवारी..; सुप्रिया सुळेंचा शिंदेंना टोला
- “शिंदे सरकारला सोडचिठ्ठी दिल्यावर बच्चू कडूंना जनता पुन्हा डोक्यावर घेतील”