मुंबई : एकनाथ खडसे गुरुवारीच मुंबईत दाखल झाले होते. आज दुपारी दोन वाजता शरद पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. यासाठी खडसे यांचे मुक्ताईनगरमधील समर्थकही मुंबईत आले आहेत. या समर्थकांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी खडसे समर्थकांनी गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला. गिरीश महाजन केवळ नाथाभाऊंसोबत आहोत, असे दाखवत होते. पण प्रत्यक्षात ते देवेंद्र फडणवीस यांचे मित्र होते. यामुळेच ते नाथाभाऊंना सुप्तपणे विरोध करत होते, अशी खदखद या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.
एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत आल्यानंतर आता त्यांना नेमकं कोणतं पद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. एकनाथ खडसे यांना विधानपरिषदेवर घेऊन त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते अशी देखील सध्या जोरदार राजकीय चर्चा सुरु आहे. त्यासाठी राष्ट्र्वादीतीलच एका मंत्र्यांला राजीनामा द्यायला लागू शकतो अशी जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. राष्ट्रवादीमध्ये सध्या सर्व मंत्री ऍक्टिव्ह मोडमध्ये आहेत अशात पुणे जिल्ह्यातील मंत्री वळसे पाटील हे सध्या प्रकृती अस्वस्थतेमुळे तितकेशे ऍक्टिव्ह नाहीत त्यामुळे दिलीप वळसे पाटील यांचा राजीनामा घेऊन त्याजागी एकनाथ खडसे यांची वर्णी लागू शकते अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करण्यापूर्वी शुक्रवारी सकाळी एकनाथ खडसे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उत्तर महाराष्ट्राला माझ्याकडून बऱ्याच अपेक्षा असल्याचे सांगितले. उत्तर महाराष्ट्रात विकासकामांची गरज आहे. त्यासाठी आम्हाला सरकारची साथ हवी असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले.
Read Also
…मग तुमची काय गत होईल ? आमच्यासोबत राष्ट्रवादीमध्ये चलाhttps://t.co/WVIaQnbCKt#Eknathkhadase #NCP
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 23, 2020