दिवसोंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने अनेक नेते मंडळींकडून जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनी जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.
याबाबतचे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे. ” जेईई आणि नीट या दोन्ही परीक्षा कोविड महामारीचे संकट व विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेत काही महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात काव्यात अशी आग्रही मागणी केंद्र सरकारकडे करावी अशी मागणी पत्राद्वारे केली आहे’ , असे मुंडे म्हणाले आहेत.
#JEE आणि #NEET या दोन्ही परीक्षा कोविड महामारीचे संकट व विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेत काही महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात याव्यात अशी आग्रही मागणी केंद्र सरकारकडे करावी अशी मागणी आज पत्राद्वारे @CMOMaharashtra व मा. @AjitPawarSpeaks यांच्याकडे केली आहे. (1/2) #AntiStudentModiGov pic.twitter.com/4vTFLKcdJQ
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) August 26, 2020
काही दिवसांपासून जेईई आणि नीट पुढे ढकलण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांकडून मागणी करण्यात येत आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून व्यावसायिक परीक्षांसह जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यामुळे येत्या काही दिवसात होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात येणार का? , हे पाहावे लागणार आहे