पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार आणि महाविकास आघाडीतील मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे.याबाबतची माहिती स्वतः त्यांनी आपल्या ट्विटर वरून दिली आहे.
कोरोनाचे प्रमाण सध्या जरी कमी झालेले असले तरी धोका पूर्णपणे टळलेला नाही असे असताना लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण होताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता वळसे पाटील यांचा देखील कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे.
नुकतीच माझी कोरोना चाचणी करण्यात आली असून, त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.अशी माहिती वळसे पाटील यांनी ट्विट करत दिली आहे. तसेच माझी प्रकृती उत्तम असून कसलाही त्रास नसल्याचे यावेळी त्यांनी म्हंटले आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी दक्षता म्हणून कोरोणाची चाचणी करून घ्यावी. आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन असा विश्वास देखील वळसे पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये व्यक्त केला आहे.
नुकतीच माझी करोना चाचणी करण्यात आली असून, त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून कसलाही त्रास नाही. खबरदारीचा उपाय म्हणून मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी दक्षता म्हणून कोरोणाची चाचणी करून घ्यावी.
— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) October 29, 2020
Read Also
चला घेऊ छत्रपतींचा आशीर्वाद म्हणणारे छत्रपतींनाच विसरले, सचिन सावंतांचा भाजपवर हल्ला https://t.co/qHH75NbjCH @INCMaharashtra @sachin_inc @BJP4Maharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 29, 2020