मुंबई – राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत. एकनाथ खडसेंनी कोरोनाची चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. एकनाथ खडसेंची तब्येत ठीक नसल्यामुळे खडसे सध्या मुंबईलाच आहेत.
एकनाथ खडसे 30 तारखेला ईडी कार्यालयात हजर होणार होते, मात्र कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याचं पत्राद्वारे स्वतः खडसे यांनी दुजोरा दिला होता. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याची माहिती समोर आली होती. गेल्या दोन दिवसांपासून खडसे मुंबईतल्या निवासस्थानी आहेत. लक्षणे जाणवत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी घरीच थांबणं पसंत केलंय. खडसेंना दुसऱ्यांदा कोरोनाची लक्षणे जाणवत आहेत.
जळगावात असताना खडसेंना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवू लागली. लक्षणे जाणवताच त्यांनी मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले. मुंबईतल्या निवासस्थानी सोमवारी आणि मंगळवारी खडसेंनी आराम केला. दोन दिवसांपासून खडसे कार्यकर्त्यांना भेटत नाहीत वा कुणाच्याही संपर्कात नाही. अशात खडसेंनी कोरोनाची चाचणी केलेली असून, त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय.