राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली वाय. बी. चव्हाण सेंटर येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यासह आणखी काही ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
ही बैठक संपल्यानंतर सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे आणि सुनिल तटकरे वाय. बी. चव्हाण सेंटरमधून बाहेर पडले. या बैठकीनंतर सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे आणि सुनिल तटकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला.
“सामाजिक विभागासंदर्भात बैठक होती. सर्व मंत्र्यांची आपापल्या विभागाची कामे सुरु आहेत”, असं सांगून धनंजय मुंडे निघून गेले. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर कुणीही प्रतिक्रिया दिली नाही