राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये जाणार अशा अफवा विरोधकांकडून पसरवली जात आहे, यावर नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्वीट करत पक्षाची भूमिका मांडली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार ही केवळ अफवा आहे. ही अफवा विरोधक पसरवत असून ही चर्चा खोटी आणि बिनबुडाची आहे. विशेष म्हणजे भाजपाचे आमदारच राष्ट्रवादीत यायला इच्छूक आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
नवाब मलिक यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, “राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची अफवा काही जण पसरवत आहेत. ही चर्चा बिनबुडाची आहे. उलट निवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेले आमदार राष्ट्रवादीत परतण्यासाठी उत्सुक असून यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. लवकरच यावर निर्णय घेऊन सार्वजनिक केली जाईल.”
कुछ लोग 12 एनसीपी विधायकों की बीजेपी में जाने की अफवाह फैला रहें है, यह बे बुनियाद और मनगढन्त खबर है,
उलट चुनाव से पहले बीजेपी में गए विधायक एनसीपी में लौटने के लिए आतूर हैं लेकिन इस पर अभी कोई फैसला नहीं हुआ है जल्द फैसला कर जानकारी सार्वजनिक की जाए गी ।@PTI_News @ani_digital— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) August 10, 2020