मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी घेतली काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये विविध मुद्यांवर चर्चा झाली. दोन्ही पक्ष बिहार विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी संयुक्तरित्या प्रचार करायचा का, याबाबत देखील यावेळी चर्चा झाली.
दोन्ही पक्षांनी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केलेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवेसेना नेते संजय राऊत प्रचारात उतरणार आहेत. दोन्ही पक्षांनी निवडणुकीत संयुक्त प्रचार केला तर त्याचा नेमका कितपत फायदा होईल यावर या बैठकीत चर्चा झाल्याचे कळते. दोन्ही पक्षांच्या यादीनुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, सुप्रिया सुळे यांच्यासह सुमारे ६० नेते बिहारमध्ये प्रचारासाठी जातील.
याशिवाय या भेटीत मराठा, धनगर तसेच ओबीसी आरक्षणाविषयी सविस्तर चर्चा झाली.