निलेश राणे ट्विट करत म्हणाले की, काँग्रेसचे नेते सचिन सावंत सांगत आहे की संदीप सिंग भाजपाच्या जवळ होता. पण त्यांना एवढं कळत नाही, मुंबई पोलीस ७० दिवस सीबीआय चौकशीची वाट बघत होती का? तसेच निलेश राणे यांनी एक फोटो शेअर केला असून त्या फोटमधील लोकांना देखील केसमध्ये घ्या, असं सांगितले. त्याचप्रमाणे सचिन सावंत तुम्ही नगरसेवक म्हणून फक्त एकदा निवडून या किंवा उभं राहायचं धाडस दाखवा, असं आव्हान देखील निलेश राणे यांनी दिलं आहे.
काँग्रेस पक्षातला एक बावळट सचिन सावंत सांगतोय संदीप सिंग बीजेपीच्या जवळ होता. त्या मूर्खाला एवढं कळत नाही मुंबई पोलीस 70 दिवस CBI तपासाची वाट बघत होती का. मग या फोटो मधल्या लोकांना पण केस मध्ये घ्या. सचिन सावंत तू नगरसेवक म्हणून फक्त एकदा निवडून ये किंवा उभा राहायचं धाडस दाखव. pic.twitter.com/o3jzMQ3z97
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 30, 2020
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना मी विनंती करतो की भाजपा अँगलकडेही लक्ष द्यावे. सीबीआयकडून संदीप सिंहची सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात ड्रग्जप्रकरणी चौकशी केली जाणार आहे. संदीप हा बायोपीक ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाचा निर्माता होता. ज्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते, असं ट्विट सचिन सावंत यांनी केलं होतं. सचिन सावंत यांच्या या विधानावरुन आता भाजपाचे नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे.
Read Also
SSR प्रकरण : संदीप सिंहवरुन काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरुhttps://t.co/5bK5LFTn6C
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) August 29, 2020