मुंबई : कोरोनाची आकडेवारी सध्या वाढतच चालली आहे. महाराष्ट्राच्या शहरांसोबत ग्रामीण भागामध्ये देखील कोरोना मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. दिवसेंदिवस राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून यावरून आता भाजपा नेते निलेश राणे यांनी शिवसेनेला ‘करून दाखवलं’ असं म्हणत टोला लगावला आहे.मुळात करून दाखवलं ही शिवसेनेची टॅग लाईन आहे.
“करून दाखवलं… कोरोनाबाधितांच्या संख्येत महाराष्ट्र जगात पाचव्या स्थानी. रुग्णसंख्या १० लाखांच्या जवळ. हे सरकार विसरलं की करोनाशी लढायचं होतं कंगनाशी नाही,” असं म्हणत राणे यांनी सरकारवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरवरून सरकारवर हल्लाबोल केला आहे.
देशात सध्या करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महाराष्ट्रातही करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गुरूवारीदेखील राज्यात २३ हजारांपेक्षा अधिक करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे गुरूवारच्या आकडेवारीनुसार करोनाबाधितांची संख्या १० लाखांच्या जवळ पोहोचली आहे.
चिवसेनेने करून दाखवलं…
कोरोनाबाधितांच्या संख्येत महाराष्ट्र जगात पाचव्या स्थानी. रुग्णसंख्या १० लाखांच्या जवळ. हे सरकार विसरलं की कोरोनाशी लढायचं होतं कंगनाशी नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 11, 2020
Read Also
महाराष्ट्र सरकार डी कंपनीच्या इशाऱ्यावर चालते : भाजप आमदाराचा आरोपhttps://t.co/iY9nP1imJJ
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 11, 2020