अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयामधील सुनावणी दरम्यान महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख झाल्याचा दावा भाजपाचे नेते निलेश राणे यांनी केला आहे. यावरून निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती.
निलेश राणे यांनी एका ट्विटमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना या प्रकरणात राजीनामा द्यावा लागेल असं म्हटलं होतं. तर निलेश राणी यांनी आत अजून एक ट्विट करत आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. निलेश राणे यांनी एका फोटोच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. या फोटोत एक व्यक्ती पडद्याआड लपून पाहत असल्याचं दिसत आहे.
निलेश राणे यांनी फोटो शेअर करताना, “आदित्य यांची सध्याची परिस्थिती” अशी कॅप्शन दिली आहे.
Aditya’s current state pic.twitter.com/htsAsSPMGX
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 11, 2020
दरम्यान “उद्धव ठाकरे तुमच्या मुलाचं नाव सुप्रीम कोर्टाच्या रेकॉर्ड मध्ये आले, की आदित्य ठाकरेचा सुशांत सिंग राजपूतच्या केस मध्ये सहभाग जाणवतो. तुम्हाला आणि तुमच्या मुलाला लवकरच राजीनामा द्यावा लागेल कारण ह्या केस मध्ये तुम्ही आणि तुमच्या मुलाने पदाचा दुरुपयोग केला आहे,” असं ट्विट निलेश राणे यांनी केले होते.