मुंबई : निलेश राणे भाजपचे आऊटडेटेड नेते त्यांना कवडीचीही किंमत नाही, असा खोचक टोला शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंना लगावला होता.निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पत्रकारपरिषदेच्या माध्यमातून काही गंभीर आरोप केले होते. राऊत याची गल्लीत आणि शिवसेनेत काडीची किंमत नसल्यामुळे जगामध्ये कोणालाच किंमत नाही असे त्याला वाटते.अशा शब्दात राणे यांनी विनायक राऊत यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे.
काय म्हणाले होते नेमकं विनायक राऊत
भाजपचे आऊटडेटेड झालेले नेते निलेश राणे यांनी मोठा जावईशोध लावला आहे. नाणार रिफायनरीबाबतच्या बैठका मंत्रालयात आणि वर्षावर होतात, असा दावा राणेंनी केला आहे. मात्र, त्यांच्या या आरोपांना आम्ही कवडीची किंमत देत नाही. त्यांनी केलेले आरोप बेछूट आणि पोरकटपणाचे आहेत, अशा शब्दांत राऊत यांनी निलेश राणेंवर टीका केली आहे.
निलेश राणेंची राऊत यांच्यावर शेलक्या शब्दात टीका
मीटरचोर खासदार विनायक राऊत याची गल्लीत आणि शिवसेनेत काडीची किंमत नसल्यामुळे जगामध्ये कोणालाच किंमत नाही असे त्याला वाटते. शिवसेनेचे पहिल्या क्रमांकाचे नेते ह्याला हड तुड करतात आणि दरवाज्यावर पण उभा करत नाही. माझ्यावर विनायकचा राग मी समजू शकतो कारण मला त्याची खरी लायकी माहिती आहे.

— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 24, 2020