मुंबई : फ्रान्समधील निस शहरातील हिंसाचारामुळे आता त्याचे लोन जगभर पसरत आहेत, जगभरातील मुस्लिमबहुल देश या घटनेला धरून फ्रान्सचे अध्यक्ष इम्मानुअल मॅक्रोन यांचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरत आहे.
युरोपीय आणि आशियाई देशात मोठ्या प्रमाणात मुस्लिम समुदाय आंदोलन करत आहे. याचे पडसाद आता भारतात उमटायला सुरुवात झालीये कारण महाराष्ट्रात मुंबई आणि मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये फ्रान्स सरकारविरोधात जोरदार मोर्चे काढण्यात आले आहेत.
पण आता यामुळे भारतात काही होणार नाही, फ्रान्सच्या घटनेमुळे मुंबई आणि महाराष्टात कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही अशी ग्वाही पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे. कारण काल मुंबईत काही ठिकाणी मोर्चे काढण्यात आले होते त्यामुळे कायदा व सुव्ययस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.
दरम्यान देशात आज पैगंबरांच्या जन्मदिनानिमित्त ईद मिलादुन्नबी हा सण साजरा केला जात आहे. या सणानिमित्त महाराष्ट्र युवक काँग्रेस च्या वतीने रक्तदान शिबीराच आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये जवळपास ८३ लोकांनी आपलं बहुमूल्य रक्त दान केलं आहे. काँग्रेसच्या या उपक्रमाचं मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात येत आहे.
Read Also :
राज्यपाल नियुक्त आमदारपदी अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांची वर्णी, शिवसेनेची ऑफर स्वीकारली https://t.co/HAxFQibvrq@ShivSena @CMOMaharashtra @UrmilaMatondkar
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 30, 2020