माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती खालावली आहे. रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, फुफ्फुसाचा संसर्ग झाल्याची लक्षणं दिसल्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. प्रणव मुखर्जी यांच्यावर आर्मी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्णालयाकडून प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीची माहिती देण्यात आली आहे.
. याआधी प्रणव मुखर्जी यांच्या मुलाने त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती दिली होती.’प्रणव मुखर्जी यांच्यामध्ये फुफ्फुसाचा संसर्ग झाल्याची लक्षणं दिसत असून प्रकृती बिघडली आहे. ते अद्यापही व्हेंटिलेटरवर असून तज्ञांची टीम त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे,’ अशी माहिती रुग्णालयाने दिली आहे. मुखर्जी यांच्यावर आर्मी रुग्णलयात उपचार सुरु आहेत. त्यांना कोरोना झाल्याचे सांगण्यात आले होते. तर, आपली करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी स्वतःच ट्विट केले होते. त्यामुळे त्यांच्य्यावर कोरोनाचेही उपचार सुरुच आहेत.