सुशांतसिंह प्रकरणात सीबीआय चौकशी करावी, ही पार्थ पवार यांची मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेटाळून लावली. “पार्थ इममॅच्युअर आहे, त्यांच्या मागणीला कवडीचीही किंमत नाही, असे मोठे विधान शरद पवार यांनी केले होते. शरद पवार यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली.
“पवार कुटुंबात काही वाद नाहीत, पवार साहेबांनी सांगितलंय, त्यावर मी बोलण्याची गरज नाही. साहेब म्हणालेत, ‘पार्थ इममॅच्युअर आहे,’ असं बोलले आहेत, हिंदीत त्याला काही वेगळं म्हणतात, नया है वह…, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
छगन भुजबळ म्हणाले, “या प्रकारामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दुखावले गेले नाहीत, आम्ही सगळं एक कुंटुंबच आहोत. कुंटुबातील लोकांना आपण असं बोलत असतो. समजावताना म्हणतो, लहान आहे, ठिक आहे. पवार साहेबांनी काही म्हटलं नाही. वडाची साल पिंपळाला लावण्याचा हा प्रयत्न आहे.