नाशिक : नाशिक येथील काळाराम मंदिराच्या आजुबाजूला काही आक्षेपार्ह पत्रकं वाटण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पत्रकारावर काळाराम मंदिर आसपास असणाऱ्या सर्व अस्पृश्य शुद्रांना मंदिरात प्रवेश वर्ज्य असल्याचं म्हटलं आहे. त्यावरून आता राज्यात मोठा गदारोळ माजला आहे. यावरून आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अशांना एक कडक इशारा दिलाय.
हेही वाचा..खेडमधून अतुल देशमुखांची उमेदवारी निश्चित; ‘मविआ’च्या मुंगसे, काळे यांचा पत्ता कट!
काल संपुर्ण नाशिक शहरात काही आक्षेपार्ह पत्रकं वाटण्यात आली असून यावर हिंन्दू युवा वाहिनीचा उल्लेख आहे. तर यामध्ये काळाराम मंदिर आसपास असणाऱ्या सर्व अस्पृश्य शुद्रांना ताकीद देण्यात येते की, मंदिरा जवळ कुठेही तुमचा निळा, पिवळा झेंडा लावू नये तसे केल्यास पाठीवर पुन्हा झाडू आणि गळ्यात मडके देण्यात येईल. असा इशारा देण्यात आलाय.
हेही वाचा..“मी ९ मंत्री पाडणार, १३ तारखेला सांगतो,” मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा
तसेच पुढे असं म्हटलंय की, हे हिंदू राष्ट्र आहे आणि काळाराम मंदिर सारख्या पवित्र ठिकाणी महारा नी जे भीमटे स्तंभ उभारले आहे, ते तात्काळ काढून टाकावा. मंदिराच्या चारही दरवाजावरून ये जा बंद करणे. चप्पल घालून पंचवटी परिसरात फिरून प्रभू श्रीरामाच्या धरतीला मलिन करू नये तसे दिसल्याच परिणाम भोगायला तयार रहावे. जो कोणी परत निळा हातात घेऊन दिसला तरी त्याला वाळीत टाकण्यात येईल. सर्व कट्टर हिंदूनी, शुद्र जातीसोबत मांग महार ढोर, चांभार, इत्यादीना आपल्या घरी बोलवू नये. त्यांच्या घरातील पाणी पिऊ नये. त्यांचा स्पर्श होऊ देऊ नये. असाही उल्लेख करण्यात आलाय.
या संपुर्ण प्रकरानंतर जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच ही किड संपवा, कोण असेल त्याला बेड्या ठोका, आता निळा झेंडा घेऊनच काळाराम मंदिरात जाऊ. बघू कोण रोखतो. जयभीम असंही आव्हाडांनी म्हटलंय.
ही किड संपवा … कोण असेल त्याला बेड्या ठोका
आता #निळा झेंडा घेऊनच काळाराममंदिरात जाऊ.
बघू कोण रोखतो.#जयभीम pic.twitter.com/lv7o6BKVUz— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 22, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“बर्फातला प्राणी बर्फातच पाठवुया”, वरळीत आदित्य ठाकरेंच्या विरोधात मनसेची पोस्टरबाजी
हेही वाचा..“छगन भुजबळांचं राजकीय आयुष्य असं कोणालाही संपवता येणार नाही”
हेही वाचा..भाजपची रात्री ०८ ते ०१ पर्यंत मॅरेथॉन बैठक, भाजपने घेतला मोठा निर्णय ?
हेही वाचा..“आरक्षण देतांना कोणाच्या ताटातलं काढून देऊ नये, ही ठाकरे गटाची भूमिका”
हेही वाचा..दोन तासांच्या मॅरेथॉन बैठकीत काय काय झाले ? उपोषणकर्त्यांना आज मंत्री भेटणार