मुंबई : मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थिगिती दिल्यावर मराठा समाजात संतापाची लाट आहे, सरकारने यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे अश्वसन दिले आहे. यापार्शवभूमीवर शिवसेना नेते ओमराजे निंबाळकर यांनी खासदार संभाजी राजेंची भेट घेतली आहे.
दिल्लीतील लोदी रोड येथील निवास्थानी भेट घेऊन मराठा समाजाला आरक्षणांच्या हक्काच्या लढाईत पूर्णपणे पाठिंबा दर्शवत सहभागीचे पत्र खासदार संभाजीराजे यांना दिले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी मी स्वतः आपल्या बरोबर आहे आपल्यात नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्व खासदार व मा . पंतप्रधान यांच्या समवेत बैठक बोलावण्याची मागणी यावेळी ओम राजे निंबाळकरांनी केली आहे . तसेच मराठा समाजचे नेतृत्व संभाजीराजेंनी करावे असेही ते म्हणाले.