पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा पार पडला आहे. भूमिपूजनाचा आनंदोत्सव महाराष्ट्रातही पाहायला मिळाला. अनेक भाजप कार्यकर्त्यांनी आपापल्या घरी प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करून हा सोहळा साजरा केला.
पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आणि भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी लाडू वाटप करत तसेच प्रभू श्रीम यांचे पूजन करून हा उत्सव साजरा केला. राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त आमदार महेश लांडगे यांनी एक गाणे सादर केले आहे.
“हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्री रामाचे भव्य मंदिर अयोध्येत साकारण्यासाठी असंख्य कारसेवकांचा त्याग, सरकारचा दृढनिश्चय, न्यायदेवतेचा आशीर्वाद व करोडो हिंदूंची आस्था आहे. या सर्वांना या गाण्याद्वारे आम्ही मानवंदना देत आहोत” असे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आणि भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले आहे. तसेच या गाण्याची प्रेरणा देवेंद्रजी फडणवीस यांच्यापासून मिळाली. असेही आमदार महेश लांडगे यांनी सांगितले आहे.
सदर गाण्यात पिंपरी-चिंचवड, मुंबई, अयोध्या येथील चित्रीकरण समाविष्ट आहे “युगायुगांनी शत नवसांनी मंगल दिन आला, अयोध्यापती रामचंद्र की जय जय जय बोला!” असे या गाण्याचे बोल आहेत.