अहमदनगर: भारतात कोरोना महामारीची दुसरी महाभयंकर लाट सुरु झालेली आहे. लाखांच्या वर दिवसाला रुग्ण वाढत आहेत. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश,गोवा, उत्तराखंड, दिल्ली या राज्यांत मोठ्या प्रमाणावर कोरोना संक्रमित रुग्ण आहेत. महाराष्ट्रात देशातील सर्वात जास्त रुग्ण आहेत. महाराष्ट्रात आरोग्य सेवांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. नागरिकांना बेड्स साठी, औषधांसाठी वणवण करत भटकावे लागते. अहमदनगर जिल्हातील परिस्थिती देखील हाताबाहेर जात चालली आहे. त्यासाठी आता खासदार सुजय विखे पाटील यांनी मोठे कार्य हाती घेतले आहे. ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प लवकरच अहमदनगर जिल्हात तयार होणार आहे. Oxygen generation project to be set up in Ahmednagar district; Information given by MP Sujay Vikhe
कोरोनाविरुद्धची लढाई केवळ सध्यापुरती नाही, तर प्रदीर्घ काळ चालणारी आहे. त्यामुळे उशीर झाला असला तरी सध्या त्या लढाईसाठी प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभे केले जात आहेत, असे विखे म्हणाले. विखे कुटुंबीयांनी विळद घाटातील रुग्णालयात दीड कोटी रुपये खर्चुन अत्याधुनिक व स्वयंचलित प्राणवायू निर्मितीचा प्रकल्प उभारणी सुरू केली आहे. येत्या आठ दिवसात तो कार्यान्वित होईल. ६०० लिटर प्रतिमिनिट त्याची क्षमता आहे . भारतात अॅटलास कॉप्को या कॉम्प्रेसर निर्मिती कंपनीने हा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू केले आहे . शिर्डीतही असाच प्रकल्प उभारला जात आहे, परंतु तो जुन्या तंत्रज्ञानावर आधारित असल्यामुळे त्याच्या उभारणीला व निर्मितीला उशीर होत आहे, असे विखे यांनी सांगितले .
सध्याची करोना प्रतिबंधक टाळेबंदी हा निव्वळ ‘फार्स’ आहे. सकाळी ७ ते ११ या वेळात या चार तासात पूर्ण चोवीस तासाची कसर भरून काढण्यासाठी झुंबड निर्माण होते आहे, त्यामुळे ‘ब्रेक द चेन’ ही राज्य सरकारची संकल्पना पूर्ण होताना दिसत नाही. त्यामुळे राज्य सरकारने ‘टास्क फोर्स’ चा सल्ला घेऊन नवीन धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे खासदार सुजय विखे यांनी केली. प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी नगरमधील व्यापारी, कंपन्या यांच्या संपर्कात आहोत. लवकरच त्यासाठी बैठक बोलावणार असल्याची माहिती खा. डॉ. विखे यांनी दिली. Oxygen generation project to be set up in Ahmednagar district; Information given by MP Sujay Vikhe