मुंबई : काल पाकिस्तानच्या विरोधी पक्ष्याच्या एका नेत्याने पुलवामा आणि सर्जिकल स्ट्राईक बद्दल काही धक्कादायक खुलासे केल्यानंतर आता याचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणावर पडत आहेत. जेव्हा मोदी सरकारने पुलवामाच्या आतंकवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केली होती तेव्हा त्यावर अनेक राजकीय मंडळींनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती, पण आता पाकिस्तानच्या या नेत्याने केलेल्या खुलास्याबाबत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.
शरद पवार आणि पाकिस्तानच्या नेत्याचे विडिओ शेयर करत मोदींच्या 56 इंची छातीवर तहहयात भावी पंतप्रधान, सर्वच विषयातील तज्ञ, कलियुगातील हरिश्चंद्र म्हणजेच देशातील एकमेव जाणते शरदचंद्र पवारसाहेब यांनी विचारलेल्या कुजकट प्रश्नाला खुद्द पाकिस्ताननेच दिले उत्तर! अशी जहरी टीका आमदार भातखळकर यांनी केली आहे.
मोदींच्या 56 इंची छातीवर तहहयात भावी पंतप्रधान, सर्वच विषयातील तज्ञ, कलियुगातील हरिश्चंद्र म्हणजेच देशातील एकमेव जाणते शरदचंद्र पवारसाहेब यांनी विचारलेल्या कुजकट प्रश्नाला खुद्द पाकिस्ताननेच दिले उत्तर! @PawarSpeaks pic.twitter.com/J7vP8HiLr5
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 30, 2020
दरम्यान पाकिस्तानच्या त्या विरोधी पक्षाच्या नेत्याने पाकिस्तानी संसदेत बोलताना पुलवामा हल्ला हा पाकिस्तान सरकार पुरस्कृत हल्ला होता, असा आरोपी त्यांनी केलाय, त्याचबरोबर भारतीय वैमानिक अभिनंदन यांची सुटकसुद्धा सरकारनेच जाणीवपूर्वक केली कारण पाकिस्तान सरकारला भीती होती कि भारत आता पुन्हा पाकिस्तानवर हल्ला करेल म्हणून त्यानी हे माघारीच पाऊल उचलल्याचा खुलासाही त्यांनी केला आहे.
Read Also :
CM ठाकरेंच्या आदेशानंतर रुग्णालयांच्या नावाखाली १२ हजार कोटींचा घोटाळा,भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आरोप https://t.co/QA4Rxb3bLY#Shivsena #CMThackarey #AdityaThackarey #BJP #Kiritsomayya @KiritSomaiya @BJP4Maharashtra @bjp4mumbai @ShivSena
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 30, 2020