मुंबई : फडणवीस सरकारमध्ये मंत्री असलेल्या विनोद तावडे यांना गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारण्यात आली होती. तर पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. तेव्हापासून या नेत्यांना पक्षाने साईड कॉर्नर केल्याची चर्चा होती मात्र आता विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांची भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये राष्ट्रीय सचिव म्हणून निवड केली आहे. यानंतर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Thanking all party Central Leaders Hon PM Shri @narendramodi ji, Home Minister Shri @Amitshaha ji for believing in me and our National President Shri @JPNadda ji for including me in his team.
It's an honour for me.. @blsanthosh ji, @v_shrivsatish ji.— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) September 26, 2020
केंद्रीय नेतृत्वाने राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी दिल्यानंतर पंकजा मुंडे यांनी एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांचे आभार मानले आहेत. ‘पक्षाच्या सर्व केंद्रीय नेतृत्वाचे आभार. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांनी माझ्यावर विश्वास दाखवल्याबाबत व भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी मला त्यांच्या नव्या टीममध्ये स्थान दिल्याबद्दल धन्यवाद.’ असे ट्विट त्यांनी केले आहे.
Read Also :
अजितदादांचे वरिष्ठ किती ‘इममॅच्युअर’ आणि… डिलिट केलेल्या ‘त्या’ ट्विटवरून भाजपची टीकाhttps://t.co/zy8inSc0tu#AjitPawar #TusharBhosale #NCP #BJP@AcharyaBhosale
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 26, 2020