मुंबई : शरद पवार हे या वयात प्रत्येक आपत्तीमध्ये घराबाहेर पडतात हे वैशिष्ट्य असून राज्याचे मुख्यमंत्री घरात बसून असतात. त्यामुळे शरद पवारांचे कौतुकच आहे आणि कोणी चांगलं काम करत असेल तर त्याचं कौतुक करणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यामुळे शरद पवारांचे कौतुक करून पंकजा मुंडे यांनी काही अयोग्य केलं नाही,’ असं सांगून चंद्रकांत पाटील यांना पंकजा मुंडे यांची पाठराखण केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं काम पाहून थक्क होऊन त्यांना ‘हॅट्स ऑफ पवार साहेब’ असं म्हणणाऱ्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समर्थन केलं आहे. या वयातही पवार कार्यरत आहे. त्याचं कौतुकच असून पंकजा यांनी पवारांचं कौतुक करून काहीही अयोग्य केललं नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
सांगली येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना चंद्रकांत पाटील यांना पंकजा मुंडे यांच्या ट्विटरवरून प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी हे समर्थन केलं. पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याशी सहमत असल्याचं ट्विटही त्यांनी केलं आहे
काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे?
शरद पवार यांनी कोरोना संसर्गाच्या काळात राज्यातील अनेक शहरांना भेटी देऊन तेथील उपाय योजनांची पाहणी केली. याचाही उल्लेख करत कोरोनाच्या काळात इतका सगळा दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पक्ष, विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तर कष्ट करणाऱ्या विषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबांनी शिकवले आहे, असंही पंकजा मुंडे सांगायला विसरल्या नाहीत.
ऊसतोड कामगारांच्या संपाचा तिढा सोडवण्यासाठी पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला पंकजा मुंडे उपस्थित होत्या. यावेळी पंकजा मुंडे आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. तसंच बैठकीवेळी पंकजा यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होतं.
Read Also :
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची झाली बैठक, बैठकीनंतर उद्या केंद्र सरकारशी बोलणार https://t.co/5A8fNN91Tz@CMOMaharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 29, 2020