नवीदिल्ली : यंदा मोदींचा वाढदिवस ‘सेवा सप्ताह’ म्हणून साजरा करण्याचा भाजपाचा मानस आहे. हीच गोष्ट लक्षात घेत बिहारमधील सुलेह देव समाज पार्टीचे प्रमुख पियुष मिश्रा यांनी ट्विटरवरुन हा आठवडा ‘बेरोजगारी सप्ताह’ म्हणून साजरा करावा असं आवाहन केलं.
१७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ७० वा वाढदिवस आहे. मोदींचा वाढदिवस साजरा करण्यासाठी भाजपाने तयारी सुरु केली आहे. या वर्षी मोदींचा वाढदिवस हा ‘सेवा दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सोमवारी ‘सेवा सप्ताह’ची घोषणा केली.
मात्र एकीकडे भाजपाने सेवा सप्ताहची घोषणा केलेली असतानाच दुसरीकडे भाजपाच्या विरोधकांनी मोदींचा वाढदिवस हा राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. तर भाजपाच्या ‘सेवा सप्ताह’ला आवाहन म्हणून हा आठवडा ‘बेरोजगारी सप्ताह’ म्हणून साजरा करण्याचंही आवाहन विरोधकांनी केलं आहे.
सोशल नेटवर्किंगवर यासंदर्भातील #NoMoreBJP हा हॅशटॅग सोमवारी ट्विटरवर ट्रेण्ड होताना दिसला. त्याचप्रमाणे ट्विटरवर #बेरोजगार_सप्ताह हा हॅशटॅगही वापरला जात आहे.
The country's biggest problem is unemployment. Youth are saying 'we are unemployed, employment is two government.
युवा माँगे रोजगार#बेरोजगार_सप्ताह pic.twitter.com/Dx35bEfnbg— Piyush Mishra (@PMLUCKNOW) September 14, 2020
यानंतर अनेकांनी #NoMoreBJP आणि #बेरोजगार_सप्ताह हे हॅशटॅग वापरुन ट्विट केलं. त्यामुळेच #NoMoreBJP हा हॅशटॅग सोमवारी रात्री भारतामधील टॉप ट्रेण्डींग हॅशटॅगच्या यादीत पाचव्या स्थानी आला होता.
Bhaiyon Aur Behno .. Join National Unemployment Day movement on Modiji’s birthday .
#बेरोजगार_सप्ताह pic.twitter.com/Xjtd56iIbj
— WB Youth Congress (@IYCWestBengal) September 14, 2020