सोशल मीडियावर कोणती गोष्ट कधी युजर्सला आवडणार नाही, हे सांगत येत नाही. मागील काही दिवसात रिलीज झालेली गाणी, चित्रपटांचे ट्रेलरला युट्यूबवर युजर्सनी डिसलाईक्सचा वर्षाव केला. आता पंतप्रधान मोदींचा मन की बात हा कार्यक्रम देखील याच रांगेत आला आहे. काल झालेल्या मोदींच्या मन की बात हा कार्यक्रम लोकांना आवडलेला दिसत नाही. युट्यूबवर शेअर केलेल्या या कार्यक्रमाच्या व्हिडीओवर डिसलाईक्सचा पाऊसच पडला आहे.
युट्यूबवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला बातमी लिहीपर्यंत 39 हजार जणांनी लाईक्स तर 3 लाखांपेक्षा अधिक जणांनी डिसलाईक केलेले दिसत आहे. यावरून युजर्सला मन की बातमधील मुद्दे आवडलेले दिसत नाही, हेच स्पष्ट होते.
कमेंट्समध्ये देखील युजर्सनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. जेईई आणि नीट परीक्षा घेण्यावर सरकार ठाम असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. कमेंटमध्ये तशी नाराजी अनेकांनी व्यक्त केली आहे.