अहमदनगर : शेती, शिक्षण, सहकार आणि पाणी प्रश्नासंदर्भात संपूर्ण देशाला आपल्या विचारातून निर्णय प्रक्रियेची प्रेरणा देणारे लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी शब्दबद्ध केलेल्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याा हस्ते व्हर्च्युअल सोहळ्याच्या माध्यमातून होणार आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही दिले जाणार आहे.
‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचे प्रकाशन १३ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांना पाहाता यावा, यासाठी नगर जिल्ह्याच्या चौदाही तालुक्यांत स्क्रीन आणि प्रोजेक्टरची व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. ‘प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचा नामविस्तार देखील यावेळी करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
नगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्ली येथून करणार असून, याच निमित्ताने प्रवरानगर येथे डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
करोनाच्या अनुषंगाने असणाऱ्या सर्व नियमावलींचे पालन करून हा कार्यक्रम होईल, असे विखेंनी स्पष्ट केले. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत बाळासाहेब विखे यांनी काम केले होते. त्यामुळे आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहावे यासाठी मुख्यमंत्री व बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांना मी स्वतः जाऊन निमंत्रण देणार आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी नमूद केले.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री गिरीष महाजन यांच्यासह खासदार, आमदार कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
Read Also
‘त्या’ विषयावर पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींशी बोलायला हवेhttps://t.co/iJn3yDA1IJ#RahulGandhi #PMModi #NAMO #Saamana
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 8, 2020