74व्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केले. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे देशभरात साधेपणाने हा दिवस साजरा केला जात आहे. लाल किल्ल्यावर देखील मर्यादित लोकांनाच निमंत्रण देण्यात आले होते. कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष होते.
Today three vaccines are in testing stages in India. As soon as the scientists give a green signal, the country will begin their large scale production: PM Narendra Modi at the Red Fort on #IndependenceDay pic.twitter.com/gMrhSYjQwp
— ANI (@ANI) August 15, 2020
देशवासियांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, रोनाने सगळयांना रोखलं आहे. करोनाच्या कालखंडात करोना योद्धयांनी देशवासियांची सेवा केली आहे. त्या सर्वांना मी नमन करतो. १३० कोटी देशवासियांच्या संकल्पशक्तीने करोनावर विजय मिळवू.
भारतातील लसीबाबत मोदींनी महत्त्वाची माहिती देत सांगितले की, देशातील संशोधक कोरोना व्हायरसवर लस विकसित करण्यासाठी कठोर मेहनत घेत आहेत. भारतातील तीन लसी चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यांवर आहेत. संशोधकांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर मोठया प्रमाणावर लसीचे उत्पादन सुरू होईल. कमीत कमी वेळेत कोरोनावरील लस प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याची रूपरेखा तयार आहे.