पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती. मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून ‘कहां गये वो 20 लाख करोड?’ हे राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे.
आज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसकडून राज्यातील सर्व भाजपा कार्यालय व भाजपा खासदारांच्या घरासमोर आंदोलन केले. मात्र या आंदोलना दरम्यान महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस मधील सर्व आंदोलकांना आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे आंदोलन चालू असताना पोलिसांनी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच सत्यजित तांबे यांना उचलून पोलीस गाडीत नेते असल्याचा व्हिडीओ सत्यजित तांबे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे पोस्ट केला आहे.
While, I along with my 3 colleagues were going to Maharashtra BJP office to ask #कहाँ_गए_वो_२०_लाख_करोड़ , police detained us and took us to Marine Drive Police Station.
BJP doesn't have answer to our question, hence enforcing police against us. pic.twitter.com/nruG03OCBT— Satyajeet Tambe (@satyajeettambe) August 14, 2020