मुंबई: महाराष्ट्रात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या लेटर बॉम्ब मुळे राजकारणात मोठी उलथापालथ झाली. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पदाचा राजीनामा देखील द्यावा लागला. १०० कोटींची वसुली अनिल देशमुख यांनी करायला लावली असा आरोप या पत्रात परमबीर सिंग यांनी केला होता. माजी गृहमंत्री अनिल देशमुख Former Home Minister Anil Deshmukh यांच्यावर आता गुन्हा देखील दाखल झाला आहे. सीबीआय ने अनिल देशमुखांच्या घरासहित अन्य १० कार्यालय आणि इतर ठिकाणी छापेमारी देखील केली आहे. या ठिकाणांवरून काही अत्यावश्यक कागदपत्रे,संगणक आणि इतर काही वस्तू देखील जप्त केलेल्या आहेत.
आता महाराष्ट्रात आणखी एक लेटर बॉम्ब फुटणार आहे असं वाटत आहे. अहमदनगर जिल्हातील अकोला येथे पोलीस नियंत्रण कक्षात सेवेत असलेल्या एका पोलीस निरीक्षकाने हा लेटर बॉम्ब टाकला आहे. हा लेटर बॉम्ब माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग Former Commissioner of Police Parambir Singh यांच्यावर टाकण्यात आलेला आहे. पोलीस निरीक्षक बी. आर. घाडगे Police Inspector B. R. Ghadge यांनी राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांना एक पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे कि परमबीर सिंग हे अत्यंत भ्रष्टाचार करणारे अधिकारी आहेत. हे पत्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील पाठवण्यात आलेले आहे. दरम्यान आता लेटर बॉम्ब ने खळबळ उडवणारे परमबीर सिंग हे आता अडचणीत येण्याची शक्यता आहे.
पोलीस निरीक्षक बी . आर . घाडगे यांनी २० एप्रिल रोजी हे पत्र लिहिलं असून भ्रष्टाचार प्रकरणी परमबीर सिंग यांच्यावर एफआयआर दाखल करण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे . घाडगे Police Inspector B. R. Ghadge यांनी आपल्या १४ पानी पत्रात परमबीर यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. परमबीर सिंग हे २०१५ ते २०१८ या दरम्यान ठाण्याचे पोलीस आयुक्त होते. त्यावेळी परमबीर सिंग यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला , असा दावा या पत्रात करण्यात आला आहे. भूखंडाचे व्यवहार, सरकारी निवासस्थाने आणि सुरक्षा कर्मचारी यांचा गैरवापर, तसेच अन्य मार्गांनी परमबीर यांनी भ्रष्टाचार केल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.