मुंबई : सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्यानंतर यावरून राज्यात वातावरण चांगलंच तापले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र सरकारने अनेक मागण्या मान्य केल्याने उद्याचा बंद तुर्तास मागे घेत असल्याची माहिती मराठा सकल महासंघाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली आहे.
काल रात्री उशिरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत काही महाविकास आघाडीमधील मंत्री उपस्थित होते. त्यांची सह्याद्री अतिथीगृहावर मराठा संघटनांसोबत बैठक झाली. दरम्यान या बैठकीमध्ये काही सकारात्मक निर्णय झाल्यानंतर आता 10 ऑक्टोबरचा महाराष्ट्र बंद मराठा संघटनांनी मागे घेतला आहे.
एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची देखील मागणी केली जात आहे. ही परीक्षा येत्या रविवारी होणार आहे. मराठा संघटनांनी महाराष्ट्र बंद मागे घेतला असला तरीही आंदोलन कायम ठेवलं आहे.