मुंबई : मराठा अरक्षणावरून राज्यात गदारोळ सुरू असतानाच आता ओबीसी नेते प्रकाश शेंडगे धनगर अरक्षणावरून आंदोलनाचा इशारा दिला आहे
‘धनगर समाजाचा अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला नाही तर मोठं जन आंदोलन उभारु, असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे. याबाबत आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत निर्णय घेऊन येत्या दोन दिवस तारीख जाहीर करु,” अशी माहिती प्रकाश शेंडगे यांनी दिली.
“मराठा आरक्षण मागताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये ही आमची भूमिका आहे. यापूर्वीचा 58 मोर्च्यांमध्ये 40 टक्के जनता ही दलित बहुजन होती म्हणून पाठिंबा दिला होता. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये. त्यावरचे आरक्षण त्यांनी घ्यावं. जर त्यांना मान्य असेल तर मग आम्ही खांद्याला खांदा देत त्यांच्या आंदोलनात सहभागी होऊ,” अशी भूमिका प्रकाश शेंडगे यांनी मांडली.
Read Also
डॉ.मनमोहन सिंह यांच्याबद्दल फडणवीसांनी बोलणे म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखे आहेhttps://t.co/4co58KwyDx#BalasahebThorat #DevendraFadanvis #Congress #BJPkilledPSUs @INCMaharashtra @bb_thorat
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 19, 2020