‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ओबीसींसाठी जेवढे काम केले तेवढे कोणीही केले नाही. फडणवीस सरकारने अनेक प्रश्न मार्गी लावले. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील ओबीसी समाजातूनच येतात पण आम्ही उल्लेख करत नाही. भाजपाला टार्गेट केलं जात असल्याने आम्हाला तो उल्लेख करावा लागतो,’ असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ‘भाजपामध्ये देवेंद्र फडणवीसांनी छळले. मी फक्त फडणवीसांवर नाराज आहे. माझ्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल झाला. तो फडणवीसांनी करायला लावला याचा मनस्ताप झाला. या सर्व मानसिक छळामुळेच पक्षांतराचा निर्णय घेतला,’ असं एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडताना सांगितलं. ‘गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, पांडुरंग फुंडकरांसारखे किती तरी नेते होते. त्यांच्यासोबत आजपर्यंत भाजपचे काम केले. भाजपने मला अनेक मोठी पदे दिली. मी ती नाकारू शकत नाही,’ असंही ते म्हणाले होते.
Read Also :
दिवाळीपर्यंत कोविड कालावधीतील वाढीव वीजबिलांबाबत निर्णय होण्याची शक्यता – नितीन राऊत
विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर