धुळे : धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात महाविकास आघाडी आपली 50 टक्के मतंही राखू शकली नाही. यावरून उद्याचं महाविकास आघाडी सरकारचं भवितव्य काय राहील, हेच स्पष्ट होत आहे, अशी खोचक प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.
धुळे नंदुरबार मधील अमरीश पटेल यांच्या विजयाने भाजपाची विजयाची शृंखला सुरू झाली आहे. विधानपरिषदेच्या 6 पैकी 6 जागा भाजप जिंकणार, असा विश्वास व्यक्त करतानाच तिन्ही पक्षी एकत्र येऊनही राज्यातील जनता भाजपच्या मागेच असल्याचे सिद्ध झाल्याचंही दरेकर यांनी स्पष्ट केलं.
धुळे आणि नंदुरबार स्थानिक स्वराज संस्थेच्या विधान परिषद पोटनिवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. भाजपचे उमेदवार अमरीश पटेल मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले आहे. अमरीश पटेल यांच्या विजयाची फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे. अमरीळ पटेल यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केला आहे.
धुळे आणि नंदुरबार स्थानिक स्वराज संस्थेच्या विधान परिषद पोट निवडणुकीची मतमोजणी पार पडली आहे. भाजप उमेदवार अमरीश पटेल यांना 332 मतं तर महाविकास आघाडीच्या उमेदवार अभिजीत पाटील यांना 98 मतं पडली आहे.