74 व्या स्वातंत्र्यदिन निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्यावरून देशाला संबोधित केले. यावेळी मोदींनी अनेक घोषणा केल्यास, तसेच भारतातील लसीची प्रगती कुठपर्यंत आली आहे याचे माहिती दिली.
यावेळी पंतप्रधान मोदींनी चीनवर देखील निशाणा साधला. मोदी म्हणाले की, एलओसी पासून ते ते एलएसीपर्यंत, ज्याने कुणी भारताकडे डोळा वर करून पाहिले, त्यांना आपण चोख प्रत्त्युत्तर दिले आहे. आपले जवान काय करू शकतात हे संपूर्ण जगाने लडाखमध्ये पाहिले आहे.
मोदी म्हणाले की, एवढी मोठी आपत्ती असतानाही सीमेवर देशाच्या सामर्थ्याला आव्हान देण्याचा गलिच्छ प्रयत्न झाला आहे. मात्र देशाच्या सार्वभौमत्वाकडे ज्याने डोळा वर करून पाहिले, त्याला आपल्या वीर जवानांनी त्याच भाषेत चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी संपूर्ण देश एक आहे आणि संकल्पबद्ध आहे आणि आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवत पुढे वाटचाल करत आहे.