कोरोना काळात आंदोलन करणाऱ्या विरोधकांना लज वाटली पाहिजे. त्यापेक्षा त्यांनी बिळात न बसता पीपीई किट घालून कारोना वॉर्डात जाऊन यावे, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधकांना लगावला.
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज आर्सेनिक एल्बम गोळ्या, जिल्हा परिषद सदस्यांना टॅब वाटप करण्यात आले.
यावेळी मुश्रीफ यांनी कोरोनाच्या काळातही राजकारण करणाऱ्या विरोधकांवर टीका केली. करोनाच्या काळात महाविकासआघाडीचे सरकार चांगल्या प्रकारे काम करत आहे.
अर्सेनिक अल्बमच्या गोळ्या दोन रुपयांना देऊ म्हणणाऱ्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्या गोळ्या दोन रुपयांना का दिल्या नाही? असा सवालही मुश्रीफ यांनी उपस्थित केला. तसेच, आमदार चंद्रकांत पाटील नेहमीच चुकीची विधानं करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी त्यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या कामाचे देखील कौतुक केले.