पुणे : महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वकाही सुरु केलं आहे मात्र अजूनही ठाकरे सरकारने मंदिर तसेच इतर प्रार्थनास्थळे उघडलेली नाहीत त्यामुळे भाजपच्या वतीने ठीक ठिकाणी जोरदार आंदोलन करत ठाकरे सरकारला जाग यावी आणि त्यांनी भक्तांसाठी मंदिर खुली करावी अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्राचे कुलदैवत मल्हारी म्हाळसाकांत श्री खंडोबा मंदीर श्री क्षेत्र जेजुरी येथे आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुणे जिल्हा भाजपा अध्यक्ष गणेशतात्या भेगडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील मंदीर उघडण्यासाठी जागरण गोंधळ करून जोरदार आंदोलन करण्यात आले.
जागरण गोंधळ तळी भंडारा करुन केला तिघाडी सरकारचा निषेध
जेजुरी संपूर्ण महाराष्टाचे कुलदैवत असलेल्या मल्हारी मार्तडाच्या नगरीत भाजपाचे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे यांच्या नेतृत्वाखाली मंदिर खूले करण्यासाठी आंदोलन करण्यात आले
यावेळी पूंरदर हवेलीचे नेते जालिंदर भाऊ कामठे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे जिल्हा ओबीसी सेल अध्यक्ष सागर भुमकर जेजुरी शहर अध्यक्ष सचिन पेशवे पुरंदर कार्यअध्यक्ष निलेश जगताप तालूका महिला अध्यक्ष मैनाताई जाधव जिल्हा ओबीसी संपर्क प्रमुख अलका शिंदे मध्य हवेली चे अध्यक्ष धनंजय कामठे सरचिटस रोडे सरचिटणीस श्रीकांत ताम्हाणे पुरंदर चे सरचिटणीस श्री कांत थिटे सासवड शहरअध्यक्ष साकेत जगताप आनुसुचित जमाती चे मा जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब इटकर संजय निगडे रविकाका देशपांडे कैलास जगताप नागनाथ झगडे नदिम ईनामदार आमोल जगताप भामेकाका कार्य अध्यक्ष गणेश भोसले सोषल मिडीया प्रमुख सुनिता कसबे जेष्ठ कार्य कर्ते प्रसाद अत्रे अशोक खोमणे रामदास दळवी राजू कुदळे संजय चव्हाण शिवराज झगडे पंकज घोणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते
Read Also
मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात उद्दाम भाषा, चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार https://t.co/Gdy1swZALh @ChDadaPatil @BJP4Maharashtra @mipravindarekar
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 13, 2020