मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने आज विधानसभेसाठी निवडणुकीसाठी मतदान होत आहे. अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. राहुल नार्वेकर यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे. राहुल नार्वेकर यांना 164 मते तर राजन साळवी यांना 107 मते मिळाली. त्यामुळे राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
राहुल नार्वेकर देशातील तरूण विधानसभा अध्यक्ष आहेत. मी त्यांचं अभिनंदन करतो. विधानसभा अध्यक्षांची भूमिका एका न्यायामूर्तीसारखी आहे , हे कठिण काम आहे. कायदेमंडळाला कायद्यात निष्णात असलेले अध्यक्ष मिळाले आहेत. याआधीच्या अध्यक्षांनीही उत्तम काम केलेलं आहे. वरच्या सभागृहाचे सभापती आणि खालचे अध्यक्ष आहे नातं सासरे आणि जावयाचं आहे. हा एक योगायोग आहे. असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राजकीय जीवनात चढ उतार असतात, हे सगळ्यांनी पाहिलंय. कामकाज नि:पक्षपणे चाललं पाहिजे, असं अजित पवार यांनी विधान सभा अध्यक्षांचं अभिनंदन करताना म्हटलं आहे. नार्वेकरांच्या रूपानं एक तरूण, अभ्यासू व्यक्तिमत्व सभागृहाला अध्यक्ष म्हणून मिळालंय. राहुल नार्वेकर हे आधी शिवसेनेत होते. त्यावेळीस मला कानवर आलं होतं. असंही अजित पवारांनी म्हटलं.
सत्तेसाठी पायउतार होऊन पहिल्यांदाच लोकं बाहेर गेली. माझ्यासोबत आठ ते नऊ मंत्री सत्तेतून पायउतार आझले. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एकनाथ शिॆंदे हा बाळासाहेब आणि आनंद दिघे यांचा एक सामान्य शिवसैनिक आहे. मुख्यमंत्रीपदासाठी मला समर्थन दाखवलं. यासाठी मोदी, शाह जेपी नड्डा यांचे मी आभार मानतो. सगळ्यांना वाटलं की फडणवीस मुख्यमंत्री बनतील मला खरंच काही नको होतं. पण माझ्या वैचारिक भूमिकेला पाठिंबा दिला. असं शिंदे म्हणाले.