नवीदिल्ली : महाराष्ट्र सरकारने सरकारी नोकरी आणि शिक्षणासाठी लागू केलेल्या मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.त्यामुळे शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी आज नवी दिल्ली येथे छत्रपती संभाजीराजे यांची भेट घेतली. यावेळी शेवाळे यांनी संभाजीराजे यांना निवेदन देऊन मराठा आरक्षण लढ्याचं नेतृत्व करण्याची विनंती केली. तसेच, या प्रकरणी राज्य सरकारच्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्रातील सर्व खासदारांची बैठक बोलवावी, अशी विनंतीही शेवाळे यांनी संभााजीराजे यांना केली आहे.
यापूर्वी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षण लढ्याचं नेतृत्व करावं, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी केली केलेली असतानाच आता शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी वेगळी मागणी केली आहे. मराठा आरक्षण लढ्याचं नेतृत्व खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी करावं, अशी मागणी शेवाळे यांनी केली आहे. शेवाळे यांनी थेट भाजपच्या खासदारालाच मराठा आरक्षण लढ्याची गळ घातल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
या लढ्यात सुरुवातीपासून महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यातील सर्व खासदारांना याप्रकरणी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत खासदार राहुल शेवाळे यांनी संभाजीराजे यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाच्या लढ्याला आपला नेहमीच पाठिंबा असून या लढ्याचे नेतृत्त्व राजेंनी करावे, अशी विनंती केली. तसेच या प्रकरणी राज्य सरकारच्या बरोबरीने केंद्रानेही लक्ष देऊन, पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व खासदारांची बैठक बोलवावी, अशी मागणीही त्यांनी केली.
राज्यसभा खासदार छत्रपती संभाजी राजे यांची दिल्ली येथे भेट घेऊन, मराठा आरक्षणाच्या संदर्भातील राज्यव्यापी सर्वपक्षीय लढ्याचे नेतृत्व राजेंनी करावे, अशी विनंती केली. तसेच मराठा समाजाच्या हक्काच्या या लढाईत माझाही पूर्णपणे पाठिंबा आणि सहभाग नेहमीच राहील, अशी खात्रीही राजेंना दिली.
— Rahul Shewale – राहुल शेवाळे (@shewale_rahul) September 16, 2020
याविषयी, राज्य सरकारच्या प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी, माननीय पंतप्रधानांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील सर्व खासदारांची बैठक बोलवावी, अशीही विनंती माझ्यावतीने केली.#मराठाआरक्षण #MarathaReservation @YuvrajSambhaji @ShivSena @CMOMaharashtra @ShivsenaComms @PMOIndia pic.twitter.com/w1pCzPxSVi
— Rahul Shewale – राहुल शेवाळे (@shewale_rahul) September 16, 2020
Read Also
केंद्राने हस्तक्षेप करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावावीhttps://t.co/M2bxjZQteo#NavneetRana #AmavatiMP #MarathiNews #PoliticalMaharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 16, 2020