लॉकडाऊन काळात अडचणीत आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या रकमेचे वीज बिल दिल्याच्या निषेधार्ह शिरूर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शिरूर वीज वितरण कार्यालयात आंदोलन करत कार्यालय अधिकाऱ्याच्या केबिनची तोडफोड केली यानंतर तोडफोडीविरोधात तीन मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
त्यानंतर बारा दिवसानंतर त्यांची सुटका झाल्यावर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आंदोलन करणाऱ्या मनसैनिकाला फोन करुन विचारपूस केली. शिरूर शहरासह तालुक्यातील नागरिकांना मार्च महिन्यापासून वाढीव बिले आली आहे. कोरोना काळात लॉकडाऊनमुळे आधीच नागरिक अडचणी आले असताना मोठ्या रक्कमेचे वीज बिल कमी करण्यासाठी सर्वसामान्य नागरिक वीज वितरण कार्यालयात चकरा मारत आहे. परंतु अधिकारी जागेवर नाहीत. आधीच कोरोनामुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत.
त्यात महावितरणे वाढीव बिले देऊन नागरिकांना अडचणीत आणल्याचा आरोप मनसेच्या वतीने करण्यात आला आहे. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना माहिती मनसे कार्यकर्त्यांनी दिली. परंतु उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने मनसे कार्यकर्त्यांनी थेट महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढला. तसेच यावेळी कार्यालयाबाहेर अनेक नागरिक वीज बिले कमी करण्यासाठी आले होते. परंतु अधिकारी नसल्याने त्यांची गैरसोय झाली. यामुळे मनसे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी थेट कार्यालयाची तोडफोड केली होती. यानंतर संबंधित कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती.