औरंगाबाद : मला कुठेही दंगली घडवायच्या नाहीत हे मुस्लिम बांधवांनी देखील लक्षात घेतलं पाहिजे. मुस्लिम माझ्याकडे येऊन सांगतात मला भोंग्याचा त्रास होतो. लाऊडस्पीकर हा सामाजिक विषय आहे पंरतु धार्मिक विषय नाही असं म्हणत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भोंग्यांसंदर्भात मुद्दा काढला. लाऊडस्पीकरचा विषय कधी काढायाच नाहीच का ? असा सवाल देखील त्यांनी केला.
युपीत लाऊ़डस्पीकर उतरवले जाऊ शकतात. तर महाराष्ट्रात का नाही उतरले जाऊ शकत ? असा सवाल देखील त्यांनी केला. कोर्टोनेही परवानगी घेण्यास सांगितलं आहे. कोणत्याही मशिदीकडे परवानगी नाही, संभाजीनगरमध्ये सहाशे मशिदी आहेत, इकडे काॅन्सर्ट चालते की काय? असाही सवाल त्यांनी केला. 3 तारखेनंतर ज्या ज्या ठिकाणी मशिदीवरील भोंगे असतील त्या त्याठिकाणी दुप्पट आवाजाने हनुमान चालीसा लागलीच पाहिजे, असं सांगितलं. राज ठाकरे यांची सभा चालु असताना अचानक बाजूने मशिदीवरील अजाण सुरू झालं होतं. यावेळी त्यांनी लगेच पोलिसांना अजाण बंद करायला सांगितले. त्यावेळी उपस्थित लोकांनी जोरदार टाळ्या वाजवल्या.
लोकांच्या माथी भडकवण्यासाठी जेम्स लेनसारखा माणूस उभा केला. ज्या माणसाने छत्रपती शिवाजी महाराज देशात घराघरात पोचवले त्यांना पवारांनी उतरत्या वयात त्रास द्यायला सुरू केला. माझं पवारांना सांगण आहे, आम्हाला जातीपातीबद्दल भेदभाव शिकवला नाही, छत्रपती महाराजांची रायगडावरील समाधी ही लोकमान्य टिळकांनी बांधली. त्यांना आता ब्राम्हण म्हणून बोलणार का त्यांनी पहिलं वृत्तपत्र काढलं त्यांचं नावही मराठा ठेवला होतं.
रामदास स्वामींनी आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांबाबत जे लिहलंय, त्यापेक्षा उत्तम लेखन मी बघितलं नाही, त्यावेळी त्यांनी राज ठाकरेंनी ते लिखाण वाचून दाखवलं. पवारांना हिंदू या शब्दाची अॅलर्जी आहे. शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र तर आहे. परंतु सर्वात आधी शिवाजी महाराजांचा आहे. आता मी बोलायला लागल्यावर पवार बोलायला लागेल. आधी फोटो पण महाराजांचा नसायचा आता लागल्यावर पवार बोलायला लागेल. तुमचे आमदार निवडून यावे म्हणून तुम्ही जातीय विष पसरवलं अशी टिका देखील त्यांनी शरद पवार यांच्यावर केला.