अनेक वर्षांपासूनचा राम जन्मभूमीचा संघर्षाचा शेवट आज होत आहे. पंतप्रधान नेरंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येत आज राम मंदिराचे भूमिपूजन केले जाणार आहे. दरम्यान राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा सुरू झाला आहे. संपूर्ण अयोध्या नगरी नवरी प्रमाणे नटली आहे. अयोध्येत उत्सव साजरा केला जात आहे.
महाराष्ट्रातही हा आनंदोत्सव साजरा केला जातोय. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी गुढी उभारुन राम मंदिर भूमीपूजनाचा आनंद साजरा करण्यात आला आहे.
दरम्यान, अयोध्या नगरीत राम मंदिर भूमिपूजनाचा ऐतिहासिक सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यानंतर पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित करत आहेत. नरेंद्र मोदी सकाळी साडेअकराच्या सुमारास अयोध्येत दाखल झाले. आधी त्यांनी हनुमान गढीला जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर रामलल्लाच्या मूर्तीला साष्टांग दंडवत घालत नरेंद्र मोदी यांनी आरती केली. त्यानंतर प्रत्यक्ष राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचे विधी पार पडले.