अनेक दशकांच्या प्रतिक्षेनंतर अखेर काल अयोध्येतील राममंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडलेल्या या कार्यक्रमाची जयत्त तयारी करण्यात आली होती. आता यानंतर मंदिराच्या उभारणीची सर्वांना प्रतिक्षा लागली आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी जवळपास 3 वर्ष लागू शकतात असे सांगितले जात आहे.
10-12 दिवसांमध्ये नकाशा मंजूर झाल्यानंतर मंदिराचे काम सुरू होईल. यासाठी २ दिवसांत अयोध्या विकास प्राधिकरणाकडे अर्ज जाईल. मंजुरीसाठी आठवडा लागू शकतो. ट्रस्ट मंदिर उभारणीसाठी एकाच वेळी अनेक आघाड्यांवर काम सुरू करेल. सर्वात आधी तेथील माती परिक्षण केले जाईल.
ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनुसार, एका महिन्यात पायाचे खोदकाम पूर्ण होईल. पाया खोदण्यासाठी ६ एकर जमिनीवर आखणी केली जाईल. यानंतर लोखंडी जाळी व काँक्रीटने पाया भरला जाईल. यासाठी ३-४ महिने लागतील. यानंतर मंदिराच्या वरील भागाचे काम सुरू होईल. वेळेमध्ये मंदिराचे काम पूर्ण झाल्यास अयोध्येमध्ये 2 वर्ष 8 महिन्यांमध्ये म्हणजेच 2023 च्या एप्रिल महिन्यामध्ये मंदिराच्या पूर्णपणे तयार असेल.